पापाचा घडा भरला आहे पण,
निर्वाणीचा दूर आहे तो क्षण,
देवंही आता गप्प बसलाय,
नऊ अवतारां नंतर धास्तावलाय !!!!
समाजाला काही,
स्त्री पुरूष समानता रुजली नाही,
रामाच्याही सीतेला
अग्नी परीक्षा चुकली नाही!!!!
बुडल्यावर दुःखात,
माणसांची पाठ फिरली.
माणूसच काय .... पण अंधारात
सावलीनेही साथ सोडली.
स्वतःच्या परिनं जिवन जगण्याची
इथे प्रत्येकास संधी नसते
प्रत्येक झाडाच्या नियती
हिरवीगार फांदी नसते
नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे
(इंटरनेटवरून साभार)
टिप्पणी पोस्ट करा