उन्हाळा सुरु झाला की, बाजारात फणस दिसू लागतात. हे फणस नुसती खाण्यासाठी देखील उपयोगात आणले जातात. कोकणात मात्र या दिवसात फणसाची भाजी करण्याची प्रथा आहे. ही भाजी एकदा करुन बघायला हरकत नाही. यासाठी बी नसलेला फणस असमासे अर्धा किलो घ्यावा शक्यतो हा फणस कापा असावा. ४ मोठे कांदे, लसूण, आलं, हिरवी मिरची, धणे पूड, काळीमिरी पूड, गरम मसाला, मीठ चवीनुसार, मोहरी तेल.
सर्वप्रथम फणसाची साले काढून त्याच्या फोडी कराव्यात. या फोडी उकडून घ्याव्यात. नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट करावी. एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट त्यात टाकावी. त्यानंतर उकडलेला फणस कुस्करुन घ्यावा आणि तो त्यात घालावा. गरम मसाला टाकून ५ मिनिटे भाजी शिजवावी. ही भाजी खाण्यास पौष्टिक असून सिजनमध्येच ही भाजी खायला मिळते.
(महान्यूज)

टिप्पणी पोस्ट करा