मुख पृष्ठ    ब्लॉग विषयी     प्रतिक्रिया 

१६ एप्रि, २०११

तेव्हा कुठे गायब झाले होते भीमसैनिक ?

राज्य घटना फेकूनच द्यायला हवी, अशाप्रकारचे वक्तव्य अभिनेते अनुपम खेर यांनी करताच भीमसैनिक म्हणवून घेणार्‍यांनी खेर यांच्या घरावर दगड व लाथा मारून संताप व्यक्त केला आहे.
शहाबानो प्रकरणाच्या वेळी देशभर मुस्लीम लोक भर रोडवर भारताची राज्यघटना जाळत होते .सर्वोच्च न्यायालयासमोर गेटसमोर राज्यघटना लाथेने उडवत होते तेव्हा कुठे गायब झाले होते भीमसैनिक ? घटनेचा अपमान केला म्हणून खेर यांना धडा शिकविणारे हे सर्व लोक त्यावेळी कोठे होते?हा प्रश्‍न आज विचारला जातो व तो महत्त्वाचा आहे
शहाबानो प्रकरणाच्या मुस्लीम मतांसाठी कॉंग्रेस ने घटना बदलली व त्या आधी शहाबुद्दीन वगैरे लोकांनी सर्वोच्च न्यायालयासमोर घटनेची होळी केली.
या देशात अराजक माजले आहे. कायदा व सुव्यवस्थेची रोज पायमल्लीच होत आहे. कायद्याचा वचक नाही आणि घटनेचा आधार नाही. राष्ट्रपतीनामक व्यक्ती देशाची घटनात्मक प्रमुख म्हणून त्या सिंहासनावर बसून असते हो, पण त्या घटनात्मक प्रमुखास इकडची काडी तिकडे करण्याचाही अधिकार नाही. त्या कसाब किंवा अफझल गुरूच्या फाशीवर शिक्का मारण्याचाही अधिकार नसेल तर कसले आले आहेत घटनात्मक प्रमुख?
जनता रस्त्यावर उतरली हा सरकारवरचा अविश्‍वास आहे. लोकांनी मेणबत्त्या वगैरे पेटवून मोर्चे काढले. हे सर्व 26-11च्या हल्ल्यानंतरही झाले होते व या मेणबत्ती संघटना तेव्हाही रस्त्यावर होत्याच. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा मेणबत्त्या पेटविल्या त्यात आश्‍चर्य काहीच नाही.