मुख पृष्ठ    ब्लॉग विषयी     प्रतिक्रिया 

१७ एप्रि, २०११

शेव्हर्ले'च्या डिझायनिंगवर "युवा मराठी'चा ठसा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई - आयटी आणि ऑटो या दोन क्षेत्रात मराठी तरुणांचा ठसा कायमच राहिला आहे. खास करून डिझाईनमध्ये मराठी तरुणांनी बाजी मारली आहे. "ऑटोकार इंडिया' व "जनरल मोटार इंडिया' यांनी मिळून घेतलेल्या "डिझायनिंग द नेक्‍स्ट शेव्हर्ले' स्पर्धेत अंतिम दहा स्पर्धकांत "कार डिझाईन'साठी चार मराठी तरुणांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. यात जॉन पॉल झेविअर्सने पहिला; तर सचिन पांचाळने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याला उत्तर अमेरिकेत "जीएम मोटार स्टुडिओ'त काम करण्याची संधी मिळणार आहे; तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अंकीत कंसारा याला "जीएम मोटार'च्या डिझाईन स्टुडिओत काम करायला मिळणार आहे. या वेळी "इंडिया मोटर्स'चे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लॅम, "जनरल मोटर्स'चे विक्री विभागाचे उपाध्यक्ष सुमीत सहानी, दिलीप छाब्रिया, "ऑटोकार इंडिया'चे होर्मार्झ सोराबजी, "जीएम इंडिया' डिझाईनचे अध्यक्ष अनिल सैनी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

सप्टेंबर 2010 मध्ये देशभरातील 25 ऑटोमोबाईल इन्स्टिट्यूटमध्ये "शेव्हर्ले'ने कार डिझायनिंगची स्पर्धा घेतली होती. यात देशातील 35 हजार मुलांमधून केवळ अंतिम दहा विद्यार्थ्यांच्या "डिझाईन्स'ची निवड झाली.

याबाबत बोलताना होर्मार्झ सोराबजी म्हणाले की, ""आम्हाला भारतीयांसाठी कार बनवायची होती. त्यामुळे भारतीय संस्कृतीची जाण असलेला या मातीतले "डिझायनर' हवे होते. यासाठी तरुणांना अधिक संधी दिली. सर्वच डिझाईन "एकापेक्षा एक' होती. त्यात तरीही त्यातून दहा जणांची निवड केली, असे "जनरल मोटार इंडिया'चे अनिल सैनी यांनी सांगितले.

आजचा भारतीय त्याच्या कारसंदर्भातील गरजा व रूप याचा अधिक विचार करतो. कार बनवताना ती "डायनॅमिक' हवी, तिचा "स्पोर्टी लूक' हवा, तरुण वर्ग आकर्षित होईल अशा सोई-सुविधा त्यात असायला हवा. सोई-सुविधांनी परिपूर्ण हवी. मुळात म्हणजे "शेव्हर्ले'च्या नावाला साजेशी अशी कार बनवायची होती. डिझाईनची मुळात आवड; आणि त्यात एवढी मोठी संधी आली होती. त्यामुळे आम्ही झपाटून काम केले. अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, असा स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येकाचाच अनुभव होता.

मराठी पाऊल पडते पुढे
द्वितीय क्रमांक ः सचिन पांचाळ, "डीएसके' इन्स्टिट्यूट, पुणे. (सध्या फ्रान्समध्ये ऑटोमोबाईलच्या कंपनीत इंटर्नशिप)