मुख पृष्ठ    ब्लॉग विषयी     प्रतिक्रिया 

८ एप्रि, २०११

गुगल म्युझिक - मराठी व हिंदी चित्रपट गीतांचा खजिना !

आपल्यापैकी बरेच जण कधीना कधी ईंटरनेटवर गाणी, गाण्याचे बोल, गाणी डाउनलोड करण्यासाठी प्रयत्न केले असतीलच. गुगलनी हे पाहिले आणि यातुनच खास गुगल ईंडीया म्युझिक (Labs) ची सुरुवात केली आहे.

www.google.co.in/music या संकेतस्थळावर गुगल काकांनी नवी-जुनी हजारो हिंदी गाणी रसिकांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहेत. या संकेतस्थळावर जाउन हवे ते गाणे सर्च करता येते आणि एका नविन पॉप-अप विंडो मध्ये गाणे चालु करता येते. गाणे डाउनलोड करण्याची किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तसेच कलाकार, गायक, संगीतकार, चित्रपटाचे नाव इत्यादीवरुन गाणे शोधण्याची सोय देखिल यामध्ये आहे.