मुख पृष्ठ    ब्लॉग विषयी     प्रतिक्रिया 

३० मे, २०११

कानमंत्र



आजकाल जिकडे पहावं तिकडे जो तो कानात हेडफोन घालून मस्त गाणी ऐकण्याच्या मूडमध्ये असतो आईवडीलांचं काही म्हणणं न ऐकणारा तरुणवर्ग सतत आयपॉड, ब्ल्यू टूथ, एमपीथ्री प्लेअरची गाणी तन्मयतेने ऐकताना दिसतात बरं ही तरुण मुलं एवढ्या मोठ्या आवाजात गाणी ऐकतात की, बाजूच्या व्यक्तीलाही त्यातून गाणे ऐकू येत असते याचा परिणाम असा होतो की हळूहळू ऐकायला येणेच बंंद पडते आणि तेव्हा कळते अरे आपल्यालाही कान होते
आजकाल गाणी ऐकणं फॅशन झाली आहे त्यामुळे ट्रेनमध्ये, बसमध्ये, कॉलेजमधून येताना-जाताना,ऑफीसमधून येताना-जाताना अनेकांना आपण हेडफोनवर गाणी ऐकताना पाहत असतो म्युझिकच्या नादात आपण हाय वॉल्युमवर गाणी ऐकतो हे कळतही नाही परिणामी कानात जी आतल्या बाजूला नस असते ती खराब होेते त्याला आम्ही ‘सेन्सरी न्युरल हिअरिंग लॉस’ म्हणतो कानाचा बाहेरचा भाग किंवा मधल्या भागावर शस्त्रक्रिया करुन तो भाग बरा करता येऊ शकतो पण आतल्या भागात समस्या उद्भवली तर मात्र कायमचे ऐकणेच बंद होते त्यावेळी श्रवणयंत्र वापरण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीे या समस्येने ग्रासलेले अनेकजण रुग्णालयात येत असतात त्यातही २५ ते ३० वयोगटातील मुलांना ही समस्या जास्त सतावू लागली आहे सध्या लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे मोठ्या आवाजात डिजे, म्युझिक स्पीकर सुरु असतात फटाके लावले जातात त्याचाही त्रास कानांना होतो तसेच सतत मोबाईलवर बोलणेही कानासाठी घातकच ठरते अशावेळी हे टाळणे योग्य ठरते
श्रवणयंत्र वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी हे लक्षात ठेवा...
- आजकाल पाचवीत शिकणारा विद्यार्थीही शाळेत जाताना आयपॉडवर गाणी ऐकत असतो आपल्या पाल्याचे कान वाचविण्यासाठी पालकांनी त्यांना कमीतकमी यंत्र वापरायला द्यावीत
- डिजे, म्युझिक स्पिकरच्या जास्त जवळ जाऊ नका अशावेळी कानात कापूस ठेवा
- गाणी ऐका पण ती कमी आवाजात ऐका
- हेडफोनवर सतत गाणी ऐकू नका
- मोबाईलचा कमीतकमी वापर करा तसेच मोबाईलवर बोलताना दोन्ही कानांचा वापर करा नेहमीच एकाच कानाला मोबाईल लावू नका.
- डॉ बची हाथीराम
कान, नाक, घसा विभाग नायर रुग्णालय 

(इंटरनेटवरून)